वाघोली (प्रतिनिधी) – लोणीकंद पोलीस ठाण्यातील केसनंद चौकी मधील एका पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार अमोल पायगुडे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याची बातमी दैनिक प्रभात ने दि. २४. रोजी प्रसिद्ध केली होती.
वाडे बोल्हाई येथील सोन्याच्या दुकानदाराने पैसे व सोन्याचा दागिन्यांच्या बाबतीत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 29 जानेवारी रोजी दिलेल्या तक्रार अर्जाची दखल अखेर लोणीकंद पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी घेतली असून लोणीकंद पोलीस ठाण्यात पैसे व दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अमोल पायगुडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेबोल्हाई तालुका हवेली येथील महालक्ष्मी ज्वेलर्स चे दुकानदार नितीन सुभाष शिरसागर रा. शिवरकर वस्ती वाघोली यांनी लोकांचा विश्वास संपादन अमोल पायगुडे यांच्या आई मालन हीच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व 80 हजार रोख रुपये हे पाच तोळे वजनाच्या बांगड्या बनवण्यास विश्वासाने घेतले.
तसेच गावातील इतर काही लोकांनी सोन्याचे दागिने क्षीरसागर यांना देऊन दागिन्यांच्या किमतीपेक्षा कमी पैसे उसने घेतले असून दुकान बंद करून त्यांचे व पायगुडे सोन्याच्या अपहार केल्याप्रकरणी महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक नितीन सुभाष शिरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसनंद चौकी मधील त्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्याने अमोल पायगुडे यांच्याशी अरेरावी, धमकी व अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल ची लेखी तक्रार अमोल पायगुडे यांनी लेखी स्वरूपात लोणीकंद वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
केसनंद चौकी मधील त्या प्रभारी अधिकाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिली आहे. याबाबतची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र लोणीकंद पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, कैलास करे तसेच दैनिक प्रभात यांनी मला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य केले आहे.
– अमोल पायगुडे (तक्रारदार, वाडेबोल्हाई)