महाराष्ट्र शासनाकडून विराजच्या कुटुंबाला चार लाखांची आर्थिक मदत
पिंपरी – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज शुक्रवार (दि.19) जून रोजी पिंपळे सौदागर येथील खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विराज जगताप याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी, देशमुख यांनी दोषींवर कठोर करावी करण्याचे आश्वासन दिले. तसेच, सरकारच्या वतीने चार लाख 25 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून या कुटुंबाला देण्यात आला.
पिंपळे सौदागर येथील विराज जगताप याची गेल्या आठवड्यात प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी जगताप कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. व शासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळेल, अशी ग्वाही देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी, गृहमंत्री देशमुख यांनी जगताप कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने चार लाख 25 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.