बर्मिंगहॅम – भारताची अव्वल महिला धावपटू हिमा दास हिने आपली गुणवत्ता सिद्ध करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
हिमाने 200 मीटर शर्यतीत पहिल्या हीटमध्ये 23.42 सेकंद असी वेळ नोंदवली. या शर्यतीत सहभागी झालेल्या अन्य पाच महिला धावपटूंपेक्षा हिमा पहिल्यापासून आघाडीवर होती व तिने हीच आघाडी कायमही राखली.
#Athletics Update 🚨@HimaDas8 qualifies for Women 200m Semifinals after clocking 23.42s to be placed 1st in Heat 2
All the best for the Semis Champ!! #Cheer4India 🇮🇳#India4CWG2022 pic.twitter.com/0oewkxB1KL
— SAI Media (@Media_SAI) August 4, 2022
झाम्बियाच्या रोडा नजोबवुने 23.85 सेकंद वेळेसह दुसरे तर, युगांडाच्या जासेंट नायमहुंगेने 24.07 सेकंद वेळेसह तिसरे स्थान प्राप्त केले.