बर्मिंगॅहम – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हीने यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या एकेरीत ऐतिहासिक कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.
महिला एकेरीच्या बॅडमिंटन अंतिम सामन्यात सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हीच्यावर 21-15, 21-13 असा सरळ दोन गेममध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकावले. सिंधूने यंदाच्या स्पर्धेत आपला दबदबा सिद्ध करताना एकही सामना गमावला नाही.
SINDHU’S GOLDEN VICTORY!
Shuttler @Pvsindhu1 wins her 1st ever #CWG gold medal in the Women’s Singles event after defeating Canada’s Michelle Li (21-15, 21-13) at the #CommonwealthGames2022.
Heartiest congratulations, Champ!!
Your dedication & hard work has made India proud! pic.twitter.com/IiMEesXRyk— Dept of Sports MYAS (@IndiaSports) August 8, 2022
या अंतिम लढतीत सिंधूने पहिला गेम 21-15 असा जिंकला व 1-0 अशी आघाडी घेतली. तिला या स्पर्धेत स्नायुंच्या दुखापतीने हैराण केले होते. मात्र, त्यानंतरही तिने स्वप्नवत कामगिरी केली.
तिने दुसरी गेम 21-13 अशी जिंकली व सुवर्णपदकाचे स्वपुन पूर्ण केले. सिंधूच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने पदक तालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत चौथे स्थान मिळवले.