मुंबई – बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीत समावेश असल्याचीही मोठी माहिती समोर आली आहे. कॉर्डेलिया या २ हजार प्रवासी क्षमतेच्या आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होत. या क्रूझवर सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी आर्यन खानसह १० हून अधिक मोठ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
#UPDATE | We’ve intercepted some persons. The probe is underway. Drugs have been recovered. We’re investigating 8-10 persons: Sameer Wankhede, Zonal Director, NCB, Mumbai
“I can’t comment on it”, says Wankhede on being asked, “Was any celebrity present at the party?” pic.twitter.com/BxBOODT0wg
— ANI (@ANI) October 2, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान याचीही चौकशी केली जात असून ड्रग्ज पार्टीशी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली आहे. आर्यन खानने कबूल केले की तो या पार्टीचा भाग होता. त्याने चूक केल्याची कबुलीही दिली आहे.
दरम्यान, क्रूझ जहाज मुंबईतून गोव्याकडे जात होते. मात्र या जहाजावर एनसीबीने शनिवारी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती. अशी माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं.