Hemant Soren : झारखंडमधील कथित जमीन फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मागील काही दिवसांपासून ईडीपासून पळ काढताना दिसून येत होते. ईडी हेमंत सोरेन यांच्या शोधात होती. मात्र आता एक बातमी समोर येत असून हेमंत सोरेन हे आपल्या निवासस्थानी दाखल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर सोरेन यांनी आपल्या आमदारांची बैठक घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे.
झारखंडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आपल्या रांची येथील निवासस्थानी कधी आणि कसे पोहचले याविषयी कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र राज्यातील एकूण वातावरण पाहता तीन ठिकाणी यात मुख्यमंत्री निवासस्थान, ईडी कार्यालय, आणि राजभवन याठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आली आहे.
उद्या हजर राहण्याचे आदेश
ईडीने हेमंत सोरेन यांना मागच्या आठवड्यात मनी लॉन्डरिंग प्रकरणी २० ते ३१ जानेवारी दरम्यान कार्यलयात हजार राहण्याचे समन्स बजावले होते.तर दुसरीकडे हेमंत सोरेन यांनी ईडीला एक पत्र लिहून आपल्यावर राजकीय षडयंत्राच्या अखत्यारीत येऊन कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, त्यानंतर 27 जानेवारीला दुपारी मुख्यमंत्री बाहेर पडले नाहीत. दरम्यान, एचडीएलएला मुख्यमंत्री कार्यालयाकडून 31 जानेवारीला उपस्थित राहण्यास सांगणारा मेल आला आहे. त्यानुसार आता उद्या सोरेन ईडी कार्यालयात हजार होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.