Baba Ramdev : योगगुरु रामदेव बाबा यांचा न्यूयॉर्क येथील मॅडम तुसाद म्यूझियममध्ये मेणाचा पुतळा बसवण्यात येणार आहे. रामदेव बाबा हे पहिलेच भारतीय साधू असतील ज्यांचा मेणाचा पुतळा लंडनच्या मॅडम तुसादमध्ये बसवला जाणार आहे. याआधी लंडनमधील या म्युझियममध्ये महात्मा गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासह जवळपास 12 सेलिब्रिटींचे पुतळे लावण्यात आले आहेत.
आज दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खुद्द योगगुरू बाबा रामदेन यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी पतंजली योगपीठचे सह संस्थापक आचार्य बालकृष्ण आणि पतंजली योगपीठ (यूके) ट्रस्टच्या संस्थापक ट्रस्टी सुनीता पोद्दार हे उपस्थित होते.यादरम्यान बाबा रामदेव यांनी सांगितले की, पुतळा बनवण्यापूर्वी 2018 मध्ये तुषाद न्यूयॉर्कच्या टीमने दोनशेहून अधिक वेळा शरीराचे मोजमाप केले होते. यावेळी टीमने त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव रेकॉर्ड करून शेकडो फोटो काढले.
मॅडम तुसाद न्यूयॉर्कमध्ये बाबा रामदेव यांचा मेणाचा पुतळा वृक्षासन पोझमध्ये दिसणार आहे. ही प्रतिकृती सोहळ्यासाठी दिल्लीत पोहोचली असून समारंभानंतर न्यूयॉर्कला रवाना होणार आहे. पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रवक्ते एसके तिजारावाला यांच्या मते, हा भारतीय संस्कृती, संन्यास आणि सनातन योग परंपरेसाठी जागतिक प्रतिष्ठेचा ऐतिहासिक क्षण आहे. योग गुरु बाबा रामदेव हे मॅडम तुसाद म्यूझियममध्ये जगा मिळवणारे पहिले भारतीय संन्यासी असल्याचे पतंजलीने दावा केला आहे.
मेणाचा पुतळा बनवण्यासाठी किती खर्च येतो?
रिपोर्टनुसार, मेणाचा पुतळा बनवण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो. यात डोक्यापासून पायापर्यंत मोजण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा समावेश आहे. एकावेळी एक केस मूर्तीला जोडलेला असतो. यास बराच वेळ लागतो. मेणाचा पुतळा बनवण्यासाठी किमान दीड ते दोन कोटी रुपये खर्च येतो.
मॅडम तुसाद संग्रहालयाची माहिती
मॅडम तुसाद संग्रहालयाची स्थापना १८३५ मध्ये झाली. मादाम तुसाद संग्रहालय हे मेणाच्या आकृत्यांचे जगप्रसिद्ध संग्रहालय आहे. या म्युझियममध्ये जगभरातील मोठ्या व्यक्तींचे पुतळे आहेत. आतापर्यंत या संग्रहालयात भारतातील १२ सेलिब्रिटींचे पुतळे लावण्यात आले आहेत. आता बाबा रामदेवही या सेलिब्रिटींमध्ये सामील होणार आहेत.