पिंपरी -जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून चिंचवडगावात जाण्याकरिता जड-अवजड वाहनांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्याकरिता महावीर चौकाकडून चिंचवडगावात जाणाऱ्या मार्गावर लोखंडी गर्डर लावण्यात आले आहेत. अवजड वाहनांना आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातून वळण घ्यावे, असा बदल करण्यात आला आहे.
महामार्गावरून चिंचवडगावात जाण्यासाठी केलेल्या या बदलाची माहिती दर्शविणारा फलक महामार्गावर काही अंतरावर लावणे अपेक्षित होते; मात्र हा फलक आतील बाजूल लावण्यात आल्याने अजवड वाहनचालकांच्या लक्षात येत नाही व ते थेट वाहने चिंचवडकडे नेतात.
अचानक हे गर्डर दिसल्याने वाहन मागे घेण्यात वेळ खर्ची पडत असून, मागून येणाऱ्या वाहनांचा खोळंबा होत आहे. तसेच अवजड वाहने मागे येत असल्याने इतर वाहनांना थांबावे लागत असून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.