#HBD : हिंदी सिनेसृष्टीचे सुपरस्टार ‘दिलीप कुमार’ यांचा आज वाढदिवस

मुंबई – हिंदी सिनेसृष्टीनं 70-80 च्या दशकात अनेक दमदार अभिनेत्यांना जन्माला घातलं यातीलच प्रसिद्ध अभिनेता म्हणजे दिलीप कुमार.11 डिसेंबर 1922 मध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे जन्मलेले दिलीप कुमार आज 97 वा वाढदिवस साजरा करत आहेत.


सध्या सिनेसृष्टीपासून दूर असले तरी एकेकाळी याच बॉलिवूडवर त्यांनी एकहाती राज्य केलं होतं. त्यामुळे आजही त्यांचे असंख्य चाहते आहेत. दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसुफ खान असं आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांनी हे नाव बदलून दिलीप कुमार असं केलं.

त्या गोल्डन इरामध्ये दिलीप कुमार त्यांच्या सिनेमांसोबतच लव्ह रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत राहत असत. त्यांचे नाव अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्रींशी जोडलं गेलं मात्र सायरा बानो यांच्याशी असलेलं त्यांचं नातं शेवटपर्यंत टिकल दरम्यान, सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 1966 मध्ये लग्न केलं. त्यावेळी सायरा अवघ्या 22 वर्षांच्या होत्या तर दिलीप कुमार 44 वर्षांचे होते.


दाग, शक्ति, राम और श्याम, लीडर नया दौर, देवदास आज़ाद, यांनसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या दमदार भूमिकेसाठी त्यांना फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार तब्बल आठ वेळा मिळाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)