शिवनेरीचे बुकिंग काउंटर प्रवेशद्वारावर

खासगी वाहतुकीला बसणार आळा : प्रवासी वाढणार

पुणे – पुणे स्टेशन एस. टी स्थानकातील शिवनेरी बसचे बुकिंग काउंटर प्रवेशद्वाराजवळ आणण्यात आले आहे. यापूर्वी स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात खासगी वाहनचालक मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची फसवणूक करत होते. मात्र, आता काउंटर बुकिंग प्रवाशांच्या निदर्शनास ठेवण्यात आल्याने खासगी वाहतुकीला आळा बसणार आहे. तसेच शिवनेरी बसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढणार आहे.

पुणे स्टेशन परिसरातील एस. टी स्थानकातील मुंबई व इतर ठिकाणी शिवशाही बसचे मोठ्या प्रमाणात संचलन केले जाते. तसेच या परिसरात रेल्वे स्थानक असल्याने पुण्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या स्थानकात असणारे शिवनेरी बसचे बुकिंग काउंटर अंतर्गत भागात असल्याने प्रवाशांच्या निदर्शनास पडत नव्हते. याचा गैरफायदा घेत खासगी वाहतूकदार प्रवाशांना स्टेशन परिसरातून मुंबईला एस. टी वाहतूक होत नसल्याचे सांगून प्रत्येकी पाचशे ते सहाशे रुपये घेत मुंबईला सोडत होते.

नवीन प्रवाशांमध्येही संभ्रम निर्माण होत प्रवासीही मोठ्या संख्येने खासगी गाडीने प्रवास करत होते. याबद्दलची माहिती एस. टी प्रशासनाला मिळाल्याने त्यांनी बुकिंग काउंटर प्रवेशद्वारावर घेतले आहे. आता शिवनेरी बसचे निश्‍चितपणे प्रवासी वाढण्यास मदत होणार आहेत.

एस. टी स्थानकातील शिवनेरी बसचे बुकिंग काउंटर सुरू असल्याची माहिती बहुतांश प्रवाशांना मिळत नव्हती. आता बुकिंग काउंटर प्रवेशद्वारावर घेतल्याने शिवनेरी बसच्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. वैशाली मुरादे, स्थानक प्रमुख

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)