Gashmeer Mahajani : अभिनेता गश्मीर महाजनी याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘देऊळ बंद’ चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. मराठी चित्रपटांसह त्याने ‘ईमली’, ‘तेरे इश्क मे घायल’ या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
सोशल मीडियावर देखील तो नेहमी सक्रिय असल्याचे दिसते. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयासह त्याच्या हँडसम लुकने त्याने अनेकांची मनं जिंकली आहे. नुकतेच त्याने एक ट्वीट अर्थात एक्सवर केले आहे. ज्यामुळे त्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एका चाहत्याने गश्मीरचे फोटो शेअर ‘मराठी सिनेअभिनेते सुपरस्टार गश्मीर महाजनी’, असे कॅप्शन दिले. यावर गश्मिरनं रिट्विट करत चाहत्याला रिप्लाय दिला. त्याने लिहिले, ‘कृपया सुपरस्टार बोलु नका. अजून सुपरस्टार व्हायला वेळ आहे. आता मराठीत कुणीच सुपरस्टार नाही. पण एक दिवस होणार नक्की.. सुपरस्टार तो असतो जो रस्त्यावरून चालला की सर्वलोक कपडे फाडतात. नक्की होणार… माझं वचन आहे. पण आता इतकं सहज कुणाला सुपरस्टार म्हणु नका.’
त्याच्या या पोस्टनंतर अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. तर काहींनी त्याच्यावर टीका देखील केली आहे. यावर एका युजरने कमेंट करत ‘तुमच्यासारखा अभिनेता मराठी भाषेत असणे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी…’ असे लिहिले आहे.
Plz superstar बोलु नका… अजून सुपरस्टार व्हायला वेळ आहे. आत्ता मराठीत कुणीच सुपरस्टार नाही. पण एक दिवस होणार नक्की .. सुपरस्टार तो असतो जो रस्त्यावरून चाल्ला कि सर्वलोक कपडे फाडतात… नक्की होणार … माझं वचन आहे. पण आत्ता इतकं सहज कुणाला सुपरस्टार म्हणु नका 🙏🏻 https://t.co/EYMPceIQDp
— Gashmeer Mahajani (@Gashmeer) February 24, 2024
गश्मीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने हिंदी मालिका आणि रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. अभिनयाबरोबरच गश्मीर उत्तम डान्सरही आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ या चित्रपटात रवींद्र आणि गश्मीर महाजनी एकत्रच झळकले होते. देऊळ बंदमध्ये देखील ते एकत्र दिसले होते. गश्मीरने ‘देऊळ बंद’, ‘बोनस’ ‘धर्मवीर’, ‘कॅरी ऑन मराठा’ या सिनेमांत काम केले आहे.