मिडी बसच्या इंजिनचा स्फोट; पीएमपीचे तीन कर्मचारी जखमी

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील निगडी डेपोतील मिडी बसचा स्फोट होऊन तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी पिंपरीतील यशवतंराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) दाखल करण्यात आले आहे. इंजिनमधील बेलहौजिंग फुटल्याने त्यामधील स्पेअरपार्ट व स्प्रिंगा बाहेर फेकल्या गेल्या. यामुळे हिरामण अल्हाट, मोहन वळसे, लक्ष्मण ढेंगळे हे कर्मचारी जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.