Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आज हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निरीक्षण पुढे आले आहे. याबाबतचे निरीक्षण पीएमपीएल कोर्टाने (PMLA Court) नोंदवले आहे.
पीएमएलए कोर्टाने महेश गुरवचा जामीन अर्ज फेटाळताना हे निरीक्षण नोंदवले आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्वेस्ट केल्याचे या निरीक्षणात नोंदवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणावरील (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory Money Laundering Case) सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टाने हसन मुश्रीफ यांचे पीए आणि निकटवर्तीय असणारे महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यापूर्वी पीएमएलए कोर्टाने हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनाही अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला असून अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यानंतर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यापाठोपाठ आता मेहश गुरवही अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.
हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळल्यानंतर आता याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनीही अटकपूर्व जामीनासाठीचा मार्ग आणखी कठीण होत असल्याचं दिसत आहे.