पुणे : वेस्ट इंडिजच्या दिग्गज वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या मायकेल होल्डिंग आज 16 फेब्रुवारी 2021 रोजी 68 वर्षांचे झाले. जमैकाचा असलेल्या होल्डिंग यांची गोलंदाजी दिसायला खूप सोपी दिसत होती पण ते दिग्गज फलंदाजांना घाम फोडायचे. त्याच्या गोलंदाच्या अॅक्शनमुळे त्यांना ’व्हिस्परिंग डेथ’ या टोपणनावाने ओळखले जाते.
किंग्स्टन, जमैका येथे जन्मलेल्या मायकेल होल्डिंग यांनी आपल्या कारकिर्दीत 60 कसोटी सामने खेळले आणि एकूण 249 विकेट घेतल्या. याशिवाय त्यानी 102 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 142 विकेट घेतल्या आहेत.
कसोटीत 13 वेळा 5 बळी
विंडीजच्या या उंच वेगवान गोलंदाजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत एका डावा 13 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये ही कामगिरी त्यांनी 11 वेळा परदेशी भूमीवर केली होती. यासह त्यांनी एका कसोटी सामन्यात दोन वेळी 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांचा इकॉनॉमी रेट 2.79 होता, तर एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी 92 धावांत 8 विकेट्स अशी होती, जी त्यांनी इंग्लंडविरुद्ध केली होती.
जमैकाच्या स्टॅम्पवर छायाचित्र
जून 1988 मध्ये होल्डिंग यांचे छायाचित्र जमैका स्टॅम्पवर बार्बाडोस क्रिकेट बकलसह प्रदर्शित केले गेले. मे 2013 मध्ये मायकेल होल्डिंग यांना पूर्व लंडन विद्यापीठात मानद पदवी आणि जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
फक्त 4 देशांविरुद्ध खेळले
होल्डिंग आपल्या कसोटी कारकिर्दीत केवळ 4 देशांविरुद्ध (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका) खेळले होते. त्यांनी कसोटीमध्ये सहा अर्धशतकेही झळकावली आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 होती, जी त्यांनी एप्रिल 1986 मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती.
आठ, नऊ आणि दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 6 अर्धशतके
एकदिवसीय क्रिकेटमधील दोन अर्धशतकां व्यतिरिक्त त्यांनी कसोटीमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे, कसोटीमध्ये त्यांनी 8,9 आणि 10व्या क्रमांकावर फलंदाजी करताना एक अर्धशतक केल करण्याचा प्रकारक्रम केला आहे. त्यांनी 8व्या क्रमांकावर फलंदाजी करताना एक, 9 स्थानांवर फलंदाजी करताना 3, आणि 10 स्थानांवर फलंदाजी करताना दोन अर्धशतके केली आहेत. 9 स्थानावर फलंदाजी करताना त्यांची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 73 आहे.
होल्डिंग यांचे इतर विक्रम
*1977 मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार.
*1981 मध्ये ब्रिजटाऊन येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लिश – फलंदाज ज्योफ बॉयकॉट यांना कसोटी इतिहासातील सर्वोत्तम षटक टाकले.
*1984 मध्ये, व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत एकदिवसीय क्रिकेट – इतिहासातील 10व्या विकेटसाठी सर्वोत्तम (106 धावा) भागीदारी.
*मायकेल होल्डिंग आणि अँडी रॉबर्ट्स यांनी 33 कसोटी सामन्यांमध्ये 216 विकेट घेतल्या आहेत. नवीन चेंडूतील सर्वात यशस्वी भागीदारीपैकी एक मानली जाते.
*2009 मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश.
*2013 मध्ये, पूर्व लंडन विद्यापीठात लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार.