पुणे : एबी डिव्हिलियर्सची फलंदाजी पहायला एकदा सुरुवात केली की, तुम्हाला असे वाटेल, एबीची फलंदाजी दिवसभर पहावी. सर्वोच्च क्षमता असलेल फलंदाज, डिव्हिलियर्स क्रिकेटच्या मैदानावर त्याला वाटेल तसा फटका खेळू शकतो. यामुळेच तो क्रिकेट जगातील लाखो चाहत्यांना आवडतो.
एबी डिव्हिलियर्स, या पिढीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जोतो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शैलीदार फलंदाजी करणार परिपूर्ण खेळाडू मानला जातो. त्याच्या 15 वर्षच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याला तीन वेळा आयसीसी चा सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच तो दशकातील पाच विस्डेन क्रिकेटरपटूंपैकी एक होता. एबी डिव्हिलियर्स त्याचा आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आम्ही त्याच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील 5 सर्वोत्तम डावांवर नजर टाकणार आहोत.
149 (44 चेंडू) वि. वेस्ट इंडीज (वनडे) 2015
एबी डिव्हिलियर्स ही एक अशी खेळी आहे जी क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर, एबी डिव्हिलियर्सने 44 चेंडूत 149 धावा करत मैदानात उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांना त्याच्या फटाकेबाजीने मंत्रमुग्ध केले होते. त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 2 बाद 439 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजचा संघ 50 षटकांमध्ये 7 बाद 291 धावाच करु शकला.
217* (333 चेंडू) वि. भारत (कसोटी) 2008
2008 मध्ये एबी डिव्हिलियर्सच्या 333 चेंडूत उत्कृष्ट अशा 217* धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अहमदाबाद येथे भारताचा एक डाव आणि 90 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव अवघ्या 76 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेने 7 बाद 494 धावा केल्या. यामध्ये डिव्हिलियर्सने भारताच्या प्रत्येक गोलंदाजांची धुलाई करत आफ्रिकेच्या विजयाला पाया रचला. कारण अवघ्या तेहतीस धावांत तीन फलंदाज गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ संकटात सापडला होता.
162* (66 चेंडू) वि. वेस्ट इंडीज (वनडे) 2015
हॅप्पी बर्थडे एबी : डिव्हिलियर्सच्या कारकिर्दीतल पाच सर्वोत्तम खेळ्या
2015 विश्वचषकाच्या गट फेरीतली सामन्यादरम्यान, एबी डीव्हिलियर्सने केवळ 66 चेंडूंत 162* धावा करत दक्षिण आफ्रिकेला 5 बाद 408 अशी मजल मारुन दिली. या खेळीत एबीने 17 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी केली. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजचा संघ केवळ 151 धावांवर गारद झाला आणि आफ्रिकेने 257 धावांनी विजय मिळवला.
174 (381 चेंडू) वि. इंग्लंड (कसोटी) 2008
जुलै 2008 मध्ये, एबी डिव्हिलियर्सने जगासमोर सिद्ध केले की तो कसोटी क्रिकेटही खेळू शकतो. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 203 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेने एकूण 522 धावा केल्या, यामध्ये एबी डिव्हिलियर्सने 381 चेंडू खेळून काढत शानदार 174 धावा केल्या. एबीची ही खेळी 19 चौकारांनी सजली होती. या सामन्यात आफ्रिकेने इंग्लंडवर 10 विकेट्स राखून विजय मिळवला.
278* (418 चेंडू) वि. पाकिस्तान (कसोटी) 2010
डिव्हिलियर्सच्या नावावर दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेटमध्ये दुसर्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावांच्या खेळीचा विक्रम आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या हाशिम अमलाने दक्षिण आफ्रिकेसाठी एकमेव त्रिशतक आहे. अमलाने 2012 मध्ये इंग्लंडमध्ये 311* धावा केल्या होत्या. 2010 मध्ये डिव्हिलियस हा पराक्रम साध्य करण्याच्या जवळ आला होता. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात डिव्हिलियर्सने नाबाद 278 धावांची सुंदर खेळी केली होती.
यामध्ये डिव्हिलियर्सने अकराव्या क्रमांकाचा फलंदाज मॉर्नी मॉर्केलसह 107 धावांची भागीदारी केली होती. कर्णधार ग्रॅमी स्मिथने दक्षिण आफ्रिकेचा डाव 9 बाद 584 धावसंख्येवर घोषित केला, त्यामुळे एबीचे त्रिशक हुकले. मात्र या सामन्यात आफ्रिकेने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली.