वॉशिंग्टन – आधुनिक जगात अनेक आजारांवर उपचार असले तरी एच आय व्ही रुग्ण मात्र बरे होत नाहीत या रुग्णांना आयुष्यभर हा आजार घेऊनच जगावे लागते पण अमेरिकेतील डॉक्टरनी एका महिलेला संपूर्णपणे एचआयव्ही मुक्त केले असून ती नॉर्मल झाली आहे. यापूर्वी दोन पुरुषांनाही एचआयव्ही आजारातून मुक्त केले होते. वैज्ञानिकांनी स्टेमसेल ट्रान्सप्लांट टेक्निक वापरून या महिलेला आजारापासून मुक्त केले आहे स्टेम सेल ट्रान्सप्लांट साठी डोनर आपल्या गर्भनाळेतील रक्त दिले होते.
त्या नाळेतील रक्ताचा वापर करून त्यातील स्टेम सेल्स बाहेर काढण्यात आल्या त्या स्टेम सेल्स या एचआयव्हीग्रस्त महिलेमध्ये ट्रान्सप्लांट करण्यात आला मानवी शरिरातील पेशी जेव्हा संपूर्णपणे नादुरुस्त झालेल्या असतात तेव्हा त्या दुरुस्त करण्यासाठी स्टेमसेल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो एचआयव्ही आजारात आता वैज्ञानिकांनी स्टेमसेलचा वापर केला आहे.
या पद्धतीमध्ये बोन मॅरो मधून स्टेम सेल्स काढल्या जात होत्या पण एचआयव्हीग्रस्त रुग्णांसाठी अशा प्रकारे स्टेमसेल काढणे धोकादायक मानले जाते या उपचार पद्धती मध्ये डोनरच्या नाळेमधून स्टेम सेल्स बाहेर काढण्यात आल्यामुळे रक्त संपूर्णपणे मॅच झाले नाही. तरी चालू शकते या महिलेवर उपचार करणारे डॉक्टर कोएन बेसिन त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या उपचार पद्धतीचा वापर करून दर वर्षी अमेरिकेतील किमान 50 एचआयव्हीग्रस्तांना आजारातून मुक्त करणे शक्य होणार आहे.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या माहितीप्रमाणे बारा लाख पेक्षा जास्त लोक सध्या अमेरिकेत एचआयव्हीग्रस्त आहेत ज्या महिलेवर हे उपचार केले त्या महिलेला 2013मध्ये एचआयव्हीची बाधा झाली होती त्यानंतर तिला कॅन्सरही झाला होता. त्यामुळे तिच्या आजाराची गुंतागुंत वाढली होती यापूर्वी आणखी दोन पुरुष एचआयव्हीपासून मुक्त झाले आहेत. पण त्यांच्यावर बोन मॅरोतुन मिळवलेल्या स्टेमसेलच्या माध्यमातून उपचार करण्यात आले होते पण नाळेमधून मिळालेल्या स्टेमसेलच्या माध्यमातून उपचार करून त्यापासून मुक्त झालेली ही महिला पहिलीच रुग्ण आहे.