आणखी एकाला कोरोनाची लागण
पुणे : परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांच्या हातावर कोरोनासाठी विलगीकरण असल्याचे शिक्के मारण्यात येत आहेत. पुण्यातही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे पुण्यात आलेल्या प्रवाशांच्या हातावर हे शिक्के मारण्यात आले आहेत.
दरम्यान, पुण्यात कोरोनाची लागण झालेला आणखी एक रुग्ण वाढला आहे. हा 20 वर्षीय रुग्ण नेदरलँड वरून पुण्यात परतला होता. त्याला कोरोनाची लक्षणे दिसल्याने नायडू रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा तपासणी अहवाल शुक्रवारी पहाटे दीड वाजता प्राप्त झाला. त्यात त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. हा रुग्ण वाढल्याने पुण्यातील रुग्णाची संख्या 9 झाली आहे.