World Cup 2023 New Zealand vs South Africa Match Live Score : विश्वचषकातील 32व्या सामन्यात न्यूझीलंडसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आफ्रिकेने 50 षटकांत चार गडी बाद 357 धावा केल्या.
SA vs NZ World Cup Live Score : प्रत्युत्तरात विजयासाठी 358 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. न्यूझीलंडने 20 षटकात 5 विकेट गमावत 91 धावा केल्या आहेत. सध्या क्रीजवर ग्लेन फिलिप्स सात धावांवर तर मिचेल सँटनर एका धावेवर नाबाद आहे.
न्यूझीलंड संघास पाचवा धक्का…
तर 19व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर न्यूझीलंड संघास पाचवा धक्का बसला. डेरील मिचेलला केशव महाराजने डेव्हिड मिलरकरवी झेलबाद केले. मिचेलने 30 चेंडूत 24 धावा केल्या. त्याआधी 16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंड संघानं चौथी विकेट गमावली. टाॅम लॅथमला कागिसो रबाडाने केशव महाराजकरवी झेलबाद केले. लॅथमने 15 चेंडूत केवळ चार धावा केल्या.
न्यूझीलंडला तिसरा धक्का..
विल यंगच्या रूपाने 10.3 षटकात न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. यंग 37 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. गेराल्ड कोएत्झीने त्याला क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले.
न्यूझीलंडला दुसरा धक्का..
न्यूझीलंड संघास 9.0 षटकात 45 धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. जबरदस्त फॉर्मात असलेल्या रचिन रवींद्रने या सामन्यात अपेक्षित फलंदाजी करू शकला नाही. 16 चेंडूत 9 धावा करून तो बाद झाला. मार्को जॅन्सनच्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीने त्याचा झेल घेतला.
SA vs NZ World Cup Live: न्यूझीलंडला पहिला धक्का…
डेव्हॉन कॉनवेच्या रूपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंड संघाची धावसंख्या 8 असताना कॉनवेला मार्को यान्सेनने एडन मार्करमकरवी झेलबाद बाद केले. कॉनवेने सहा चेंडूंत केवळ दोन धावा केल्या.