New Zealand vs South Africa 1st Test, Kane Williamson Century : न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन चमकदार कामगिरी करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केन विल्यमसनने कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. केन विल्यमसनने पहिल्या डावात 118 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात केन 109 धावा करून बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची 31 शतक पूर्ण झाले आहेत. एवढेच नाही तर केन विल्यमसनने गेल्या 10 कसोटी डावांपैकी 6 डावांमध्ये शतके झळकावली आहेत. अशा स्फोटक कामगिरीमुळे केन विल्यमसन आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. दुखापतीमुळे केन विल्यमसनला काही काळ बाहेर राहावे लागले होते, तरीही त्याने दमदार पुनरागमन केलं आहे.
10 कसोटी डावांपैकी 6 डावांमध्ये शतके…
2020 पासून कसोटी सामन्यांमध्ये केन विल्यमसन फॅब 4 मध्ये आघाडीवर आहे. गेल्या 10 कसोटी डावांबद्दल बोलायचे झाले तर केन विल्यमसनने 132, 1, 121, 215, 104, 11, 13, 11, 118 आणि 109 धावा केल्या आहेत. गेल्या 10 डावांमध्ये केनची बॅट 13 धावांच्या पुढे गेली तेव्हा त्याला केवळ शतक झळकावता आले. क्रिकेटमधील हा एक विलक्षण विक्रम आहे. केन विल्यमसनने आतापर्यंत 97 कसोटी सामन्यांच्या 170 डावांमध्ये 55.13 च्या उत्कृष्ट सरासरीने 8 हजार 490 धावा केल्या आहेत. केन विल्यमसनने कसोटीत 31 शतके झळकावली आहेत. याशिवाय केन विल्यमसनने 33 अर्धशतके झळकावली आहेत. केन विल्यमसनने 6 वेळा कसोटीत द्विशतक झळकावले आहे.
Shifting gears! Kane Williamson making a hundred in each innings of a Test match for the first time. Williamson’s first century in the match came off 241 balls while he reached his second in 125 balls. Scorecard | https://t.co/W6fz0aewis #NZvSA pic.twitter.com/0n469z9S1M
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 6, 2024
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज केन विल्यमसन त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यात आहे. विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही शतक झळकावले आहे. विल्यमसनचे कसोटी क्रिकेटमधील हे 31 वे शतक ठरले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विल्यमसन आता भारताच्या विराट कोहली आणि इंग्लंडच्या जो रूटच्या पुढे आहे. सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये आता फक्त ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ केन विल्यमसनच्या पुढे आहे.
फॅब-4 मध्ये दुसऱ्या स्थानावर…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात झळकावलेले शतक हे केन विल्यमसनच्या कसोटी कारकिर्दीतील 31वे शतक आहे. फॅब-4 मध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विल्यमसन आता दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या जो रूटची 30 आणि भारताच्या विराट कोहलीची 29 शतके आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या नावावर 32 शतके आहेत. (फॅब-4 : विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रूट आणि केन विल्यमसन हे मागील एक दशकापासून कसोटी क्रिकेटमधील चार महान फलंदाज झाले आहेत. नव्या पिढीतील हे चार फलंदाज फॅब-4 म्हणून ओळखले जातात.)
फॅब-4 मध्ये सर्वाधिक कसोटी शतके ठोकणारे खेळाडू
स्टीव्ह स्मिथ – 32 शतके (107 सामने)
केन विल्यमसन – 31* शतके (97 सामने)
जो रुट -30 शतके (137 सामने)
विराट कोहली – 29 शतके (113 सामने)
सर्वात कमी डावात 31 शतके करणारा तिसरा फलंदाज…
न्यूझीलंडचा केन विल्यमसन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी डावात 31 शतके झळकावणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. विल्यमसनने कसोटी क्रिकेटमधील आपल्या 170व्या डावात 31वे शतक झळकावले आहे. या विक्रमांच्या यादीत विल्यमसनने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज रिकी पाँटिंग आणि पाकिस्तानचा माजी महान फलंदाज युनिस खानला मागे टाकले आहे. युनूस खानने 184 डावात 31 शतके झळकावली होती. तर पाँटिंगने 174 डावात 31 शतके झळकावली होती.
IND vs ENG : आर. अश्विनने रचला इतिहास, ‘विशाखापट्टणम’मध्ये मोडला 45 वर्षे जुना विक्रम…
न्यूझीलंड मजबूत स्थितीत….
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडचा संघ खूपच मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 511 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 162 धावांवर ऑलआऊट झाला. न्यूझीलंडने फॉलोऑन करण्याऐवजी पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 4 गडी गमावून 179 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे न्यूझीलंडकडे 528 धावांची आघाडी आहे. सामन्याला अजून दोन दिवस बाकी आहेत.