पुणे – शीतपेयातून गुंगीचे औषध मिसळून एका जीम ट्रेनरने सहकारी तरुणीवर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना खराडीतील पुणे फिटनेस फ्रिक जीममध्ये घडली आहे.
याप्रकरणी दीपक चौगुले (रा. पिंपरी-चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जीममध्ये दीपक आणि एक तरुणी ट्रेनर आहेत. तीन दिवसांपूर्वी दीपकने संबंधित तरुणीला फेसबुक कॉल करून जीममध्ये जेवणाचा डबा घेऊन बोलवले.
त्यानंतर दीपकने शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून तरुणीला प्यायला दिले. काही वेळानंतर तरुणीला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. कोणाला काही बोलल्यास घटनेबाबत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
श्वानाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
रस्ता ओलांडणाऱ्या भटक्या श्वानाला धडक देऊन ठार करणाऱ्या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. एम्पायर इस्टेट, चिंचवड या ठिकाणी अपघात झाला. इमारतीवरून भटक्या कुत्र्याला फेकून देणाऱ्यावर यापूर्वी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.