लंडन – विशिष्ट कार्यासाठी मदतनिधी मिळवण्याच्या हेतूने तब्बल तीन वर्षे फक्त टेंटमध्ये राहून आपले उद्दिष्ट पार करणाऱ्या एका ब्रिटिश मुलाच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
या 3 वर्षांच्या कालावधीत त्याने मदत निधीसाठी 860000 पौंडस एवढी प्रचंड रक्कम जमा केली मॅक्स उसी असे या मुलाचे नाव असून तो दहा वर्षाचा असताना त्याने बॉय इन दि टेंट ही मोहीम सुरू केली इंग्लंड मधील डेवन या शहरामधील त्याच्या घराच्या अंगणामध्ये त्याने टेन्ट ठोकून त्यामध्ये राहण्यास सुरुवात केला ती तारीख होती 28 मार्च 2020 .डेवन परिसरात कर्करोग रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीसाठी त्याने हा उपक्रम सुरू केला त्याचा शेजारी कर्करोगाशी झुंज देत असताना त्या संस्थेने त्याला केलेली मदत मॅक्सने पाहिली होती त्यामुळे प्रभावित होऊन त्याने हा विक्रम करण्याचे ठरवले ऍबट नावाचा हा शेजारी मरण पावण्यापूर्वी त्याने आपला एक टेन्ट मॅक्सला भेट दिला होता आणि या टेंटच्या माध्यमातून एखादे साहस कर असा सल्ला दिला होता.
म्हणून हा विक्रम करायचे त्याने ठरवले गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये तो ह्या तंबूचा वापर करून फक्त आपल्या घराच्या आवारातच राहत होता असे नाही तर त्याला ठीकठिकाणी आपल्या परिसरात राहण्याची निमंत्रण येत होती आणि या निमित्ताने त्याला मदत निधी मिळत होता लंडन मधील प्रख्यात प्राणी संग्रहालय, पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या टेन डाऊनिंग स्ट्रीटचा गार्डन परिसर आणि फुटबॉलची मैदाने आणि खेळांची मैदानी या ठिकाणी तंबूत वास्तव्य करून मॅक्सने मोठ्या प्रमाणात निधी जमा केला होता आयुष्यातील गेल्या तीन वर्षांचा कालावधी मी सर्वात चांगला कालावधी मानतो यानिमित्ताने मला अनेक लोकांना भेटता आले आणि अनुभव घेता आला एका मोठ्या कामासाठी मला मोठा निधी जमा करताना याचा मला जास्त आनंद आहे आणि गिनीज बुकने माझ्या उपक्रमाची नोंद घेतली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे मॅक्सने म्हटले आहे.