पिंपरी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित प्रबोधन पर्वाला उत्साहात सुरूवात झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सहयोगनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल गवळी यांनी लोकशाहीर व लोकमान्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे, मुख्याध्यापक राहुल गवळी, नीळकंठ लांडगे, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते.
रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) तर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष बबन साके, महिलाध्यक्ष रेश्मा पारदे, युवराज चंदनशिवे, बापू केदारी, अमोल उदमले, राहुल काटेख, गोरख भडकुंबे, चांददेव गालकडे आदी उपस्थित होते. तर आरपीआय (आठवले गट) तर्फे पक्षाच्या सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच समता सैनिक दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बाळासाहेब भागवत, के.एम.बुक्तर, सम्राट जकाते, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
एम्पलॉईज फेडरेशनतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त निगडी येथील पुतळ्यास कामगार नेते विनोद चांदमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ऍड. दीपक ओव्हाळ, सतीश कसबे, विलास गरड, प्रा. सुमित चांदमारे, शेषेराव सूर्यवंशी, नारायण वानखेडे, नवनाथ म्हस्के, पंढरी खिलारे आदी उपस्थित होते.
धम्मक्रांती सामाजिक संस्था
धम्मक्रांती बहुउद्देशीय समाजिक संस्थेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उरूवेला बुद्ध विहारात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे धम्मप्रकाश क्षीरसागर, रजनीकांत क्षीरसागर, आकाश शीरसाठ, बबन शिंदे, प्रमोद अवघडे, आदी उपस्थित होते.
पीपल्स रिपब्लिकन पक्ष
निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे सरचिटणीस अरूण देखणे, उपाध्यक्ष दीपक कांबळे, महिला आघाडी अध्यक्षा गेंदाबाई कांबळे, गौतम सोनवणे, अक्षय भोर, रोहित ताटे, विजू कांबळे, मंगल भालेराव आदी उपस्थित.
समाजवादी पक्ष
समाजवादी पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त निगडी येथील त्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी, सालार भाई, लालजी गायकवाड, बी. डी. यादव, रवी यादव, साजेद शेख, नरेंद्र पाटील आदी
उपस्थित होते.
शहर कॉंग्रेस
कॉंग्रेसच्या वतीने भक्ती-शक्ती चौकातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, भाऊसाहेब अडागळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, सुंदर कांबळे, लक्ष्मण रुपनर, परशूराम गुंजाळ, विशाल कसबे, संदेश बोर्डे, किशोर कळसकर, गौरव चौधरी, दीपक जाधव, आशा शहाणे, शीतल कोतवाल, रमजान अत्तार आदी उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धा
पिंपरी – काळेवाडी येथील मराठवाडा मित्र मंडळ विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. वाल्हेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी व्ही. एस. पाटील, एस. यु. शिंदे, आर. डी. धनवे, ए. पी. शिंदे, एन. एस. पाटील व वंदना भालशंकर आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे प्रशाला पिंपरी
पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथील अण्णाभाऊ साठे प्रशालेमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नगरसेविका सुलक्षाताई शिलवंत-धर, संदिपान झोंबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सुलक्षणा शिलवंत-धर व संदिपान झोंबाडे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी आपले विचार प्रगट केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी गणेश वैरागर, दादाभाऊ अल्हाट, सुधीर कांबळे, मंगेश धाडगे यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.