पौड (वार्ताहर) – करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मुळशीत लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे रविवार दि. 19 जुलै रोजी संत शिरोमणी सावतामाळी महाराजांचा समाधी पुण्यतिथी सोहळा मुळशीत करमोळी, पौड, दारवली, अंबरवेट, पिरंगुट, लवळे, वाकड, हिंजवडी या ठिकाणी घरातच राहून साजरा करावा लागला.
करमोळी येथील श्री संत सावतामाळी मंदिरामध्ये यावर्षी शासनाच्या नियमांचे पालन करून मंदिरात विधीनुसार होणारे सकाळी अभिषेक करून पूजा देवाचे पुजारी कुंडलिक चांदवीलकर आणि दीपक चांदवीलकर यांच्या हस्ते करण्यात आली. देवाचे वस्त्र व अलंकार घालण्यात आले नंतर दिवस नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी प्रणित केदारी, अनिल केदारी, संदीप केदारी, अमोल केदारी, समीर केदारी उपस्थित होते.