सलाम…सैन्यातील जवानांनी आतापर्यंत 6 हजार पुरग्रस्तांना वाचवले

देशातील पुरग्रस्त राज्यात 123 तुकड्या कार्यरत

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह केरळ आणि तामिळनाडू राज्यांनाही पुराचा फटका बसला आहे. महाराष्ट्रासह केरळ आणि तामिळनाडू येथून सैन्यातील जवानांनी 6000 पूरग्रस्तांना वाचवले आले. तर 15000 नागरिकांची सुरक्षितस्थळी रवानगी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी, पूरग्रस्त 4 राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये सैन्य दलाच्या 123 तुकड्या कार्यरत आहेत. दरम्यान, आलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. या पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांसाठी 60 हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. तसेच पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तर, सैन्य दलाचे जवानही जीवाची बाजी लावून स्थानिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्यातील पुरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ओडिसा, पंजाब व गुजरातमधील एनडीआरएफएचक्‍युचे 22, नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके दाखल आहेत सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात 1 अशी 3 पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात 76 व सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे. शिरोळमध्ये जवळपास 120 लष्कराच्या जवानांनी चार बोटीच्या साहयाने मोहीम राबवली. आपल्या पायांना जखमा झाल्या तरीही, सैन्याचे जवान मलमपट्टी करुन आपले कर्तव्य बजावत आहेत. महाराष्ट्रासह, केरळ, तामिळनाडूतही पूरस्थिती आहे. याही राज्यात सैन्याचे जवान पूरस्थितीशी लढताना दिसत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)