नवी दिल्ली : जग एकीकडे कोरोनाशी लढा देत असताना आता दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. भारताने कोरोना विरोधातील लढाई एक मोठा टप्पा गाठत, एक टेस्टिंग किट विकसित केलं आहे. या किटमुळे अगदी कमी वेळात कोरोनाची तपासणी करणं शक्य होणार असून देशभरात हे किट तपासणीसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांनी कोविड-19 च्या तपासणीसाठी पूर्णपणे स्वदेशी अशा एलीसा (Elisa) अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती केली आहे.
.@ICMRDELHI – National Institute of Virology (NIV), Pune develops & validates indigenous IgG ELISA test “COVID KAVACH ELISA” for antibody detection for #COVID19.
This will play a critical role in surveillance for #COVID19: @drharshvardhan.https://t.co/15IFT5HWXm@PMOIndia— Ministry of Health 🇮🇳 #StayHome #StaySafe (@MoHFW_INDIA) May 10, 2020
आरटी पीसीआर (RT PCR ) या कोविड टेस्टमुळे कोरोनाची बाधा झालीय की नाही हे समजते, तर पूर्णपणे स्वदेशी IgG एलिसा कोविड कवच टेस्टमुळे किती मोठ्या लोकसंख्येला किंवा समूहाला लागण होऊ शकते, हे समजण्यास मदत होणार आहे. या किटची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबईतील 2 वेगवेगळ्या परिसरांत या किट्सचा वापर करून तपासण्या करण्यात आल्या. त्यातून याचे परिणाम योग्य असल्याचे दिसून आले.
अडिच तासांत या किट्सच्या माध्यमातून 90 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या आहे. ड्र्ग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या किट्सच्या कमर्शिअल प्रोडक्शनसाठी जायडस कॅडिला (zydus cadila)ला परवानगी दिली आहे. दरम्यान, देशात जे टेस्ट किट विकसित करण्यात आलं आहे, ते एक अँटीबॉडी टेस्ट किट आहे. प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, हे किट्स लवकरच देशभरात उपलब्ध होणार आहेत.