भोर -भोर नगरपालिका कार्यक्षेत्रात लॉकडाऊन व संचारबंदी असातानाही रस्त्यावर भाजी आणि फळ विक्री करणाऱ्या 13 जनांवर भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार आप्पा हेगडे यांनी दिली. याबाबत नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक लालासाहेब यमाजी गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
शहरात करोनाचा प्रसार होवू नये म्हणून गर्दी करू नये, अनधिकृत भाजी फळ विक्री करू नका, सोशल डिस्टन्स पाळा वारंवार आवाहन, समज देवून सुद्धा 13 फळ, भाजीपाला विक्रेत्यांनी या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी महेंद्र बांदल यांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.