sharad Pawar : अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय काल निआवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय दिला होता. त्यानंतर शरद पवार यांच्याकडून आयोगासमोर पर्याय सादर करण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार यांना निवडणूक आयोगाने एक नाव दिले आहे.
शरद पवार यांना आज (७ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला नावे नाव दिले आहे. आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.
तर शरद पवार गटाकडून पक्षासाठी ‘वटवृक्ष’ या चिन्हाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणता ही निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे शरद पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या पक्षाला वटवृक्ष हे चिन्ह मिळाल्यास त्यांना राज्यात मोठा फायदा होईल.
कारण, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या रयत शिक्षण संस्थेची वटवृक्ष हेच बोधचिन्ह आहे. त्यात शरद पवार हे रयतचे सध्या अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे सामाजिक नाते असणारे वटवृक्ष हे चिन्ह मिळाल्यास शरद पवार गटाला हे चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जाण्यात जास्त अडचण नक्कीच येणार नाही.
शरद पवार गटाने आयोगाला पाठवली ३ नावे –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बुधवारी निवडणूक आयोगाला पक्षासाठी ३ नावांचा प्रस्ताव पाठवला होता. यात अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या ३ नावांचा समावेश आहे. त्यानुसार आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या नावावर शिक्का मोर्तब केला आहे.
अजित पवारांसोबत किती आमदार?
– महाराष्ट्रातील ४१आमदार
– नागालँडमधील ७ आमदार
– झारखंड १ आमदार
– लोकसभा खासदार २
– महाराष्ट्र विधानपरिषद ५
– राज्यसभा १
शरद पवारांसोबत किती आमदार?
– महाराष्ट्रातील आमदार १५
– केरळमधील आमदार १
– लोकसभा खासदार ४
– महाराष्ट्र विधानपरिषद ४
– राज्यसभा – ३