नेवासा – घरात बसून आरक्षण (Dhangar Arakshan) मिळणार नाही तर आता सर्वानी बाहेर पडून मोर्चे आंदोलने करुन महाराष्ट्रात धनगरी ताकद काय आहे ‘ती’ दाखवा धनगर आरक्षणचा लढा उभारला गेला की, एन.टी.चे पिल्लू बाहेर काढण्याचे षडयंञ पवार रचत असल्याची जोरदार टिका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. पडळकर भानसहिवरे (ता.नेवासा) येथील जयमल्हार मंगल कार्यालयात शुक्रवार (दि.१३) रोजी सकल धनगर समाजाच्यावतीने जागर याञा मेळाव्यात बोलत होते. (Sharad Pawar)
धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकारच्यावतीने भक्कमपणे बाजू मांडण्यात आलेली असून शपथपञही दाखल करण्यात आलेले आहे. आपण आरक्षणाच्या जवळ आलेलो आहोत माञ समाजाने एकजुट दाखविण्याची गरज असून घरात बसून आरक्षण मिळणार नसल्यामुळे रस्त्यावरची लढाई सुरु ठेवण्याचे आवाहन आ.गोपीचंद पडळकर यांनी केले. आपल्याला एक लाख टक्के आरक्षण मिळणार असल्याचा ठाम विश्वासही यावेळी पडळकर यांनी व्यक्त केला.
गेल्या साठ – सत्तर वर्षापासून धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नसून धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ. यासाठी लढा उभारणार असल्याचे देखील यावेळी पडळकर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी सडकून टिका केली.ते म्हणाले की,आरक्षणाची चळवळ चालू झाली की,पवार षडयंञ रचून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतात.