gold silver price today : आज गुरुवारी देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत दिलासा मिळाला आहे, जागतिक संकेतानुसार सोन्या चांदीच्या दरात घट झाली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,२२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,२७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,८८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,१८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
तर जाणून घ्या सोन्या-चांदीच्या भाव
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,९३४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९३४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,११० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९३४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,११० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९३४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,११० रुपये आहे.