Telangana – हैद्राबाद येथे एका अधिकाऱ्याच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार. तेलंगणा लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने ACB नगर नियोजन अधिकाऱ्याच्या घरातून आणि कार्यालयातून सुमारे 100 कोटी रुपया पेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्याचे नाव शिव बालकृष्ण नाव आहे. 14 पथकांनी या अधिकाऱ्याशी संबंधित असलेल्या जागेवर झडती घेतली, यावेळी कोटींच्या घरात मालमत्ता हप्त करण्यात आली, दुसऱ्या दिवशीही हा शोध सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. जप्त केलेल्या मालमत्तेत सोने, फ्लॅट आणि बँक ठेवींचा समावेश आहे.
रिपोर्ट्सनुसार, शिवा बालकृष्ण हे तेलंगणा स्टेट रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (TSRERA) चे सचिव आणि हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) चे माजी संचालक आहेत. २४ जानेवारीला पहाटे पाच वाजता या अधिकाऱ्याच्या घरी छापेमारी करणाऱ्यात आली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या कार्यालये आणि इतर प्रमुख ठिकाणांची झडती घेतल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीत २ किलो सोने, ६० घड्याळ , १४ फोन, १० लॅपटॉप आणि अनेक संपत्तीचे कागदपत्र जप्त करण्यात आले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयकर विभागाने ओडिशातील बालंगीर येथील काँग्रेस नेते धीरज साहू यांच्या भावाच्या मालकीच्या डिस्टिलरी कंपनीच्या परिसरातून 300 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त केले होते. ऑक्टोबरमध्ये, आयकर विभागाने बेंगळुरूमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून शोधमोहीम राबवली आणि बीबीएमपी कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष आणि कर्नाटक राज्य कंत्राटदारांचे उपाध्यक्ष आर अंबिकापती यांच्या फ्लॅटमधून सुमारे 42 कोटी रुपये जप्त केले.