Gold-Silver Price – आज देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत बदल दिसून येतोय. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,१५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६१,७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,७७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,६३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,८७९ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,०५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,८७९ असेल
२४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०५० रुपये असेल.
नागपूर
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,८७९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०५० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५६,८७९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०५० रुपये आहे.