IND Vs PAK T20 World Cup 2024: आईसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 मॅचचे आयोजन यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केले जात आहेत. यातील काही सामने न्यूयॉर्कमध्येही होणार आहेत. या स्टेडियममध्ये आठ टी-20 विश्वचषकाचे सामने होणार आहेत. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
आयझेनहॉवर पार्कमध्ये असलेल्या 34,000 आसनी नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये या सामन्याचे आयोजन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठीची खेळपट्टी (ड्रॉप इन पिच) फ्लोरिडामध्ये सुमारे 2000 किलोमीटर अंतरावर तयार केली जात आहे. ICC ने या स्टेडियममध्ये सुरू असलेल्या तयारीची झलक दाखवली आहे.
याबाबत ICC चे मुख्य कार्यकारी ज्योफ अॅलार्डिस म्हणाले, “आम्ही आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2024 च्या आधी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे अनावरण करताना आनंदी आहोत.” पुढील 3 महिन्यांत या स्टेडियमचे काम पूर्ण होणार आहे. येथे भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना 9 जून 2024 ला खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियममध्ये प्रीमियम, व्हीआयपी, युनिक पार्टी डेक यांसारख्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था असेल. फॉर्म्युला 1 लास वेगास ग्रँड प्रिक्ससाठी पूर्वी वापरण्यात आलेला ग्रँडस्टँड (प्रेक्षकांसाठी बसण्याची जागा) टी20 विश्वचषकासाठी वापरण्यात येत आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामागील डिझाइन टीम पॉप्युलस असून जे जगभरातील अनेक प्रतिष्ठित स्टेडियम तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लंडनमधील टोटेनहॅम हॉटस्पर स्टेडियमचा समावेश आहे. या संघाने न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्क यँकीज आणि न्यूयॉर्क मेट्स सारख्या संघांसाठी स्टेडियम तयार केले आहेत.
असे असणार भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून – वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून – वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून – वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून – वि. कॅनडा, फ्लोरिडा
असा असेल वर्ल्ड कपचा ग्रुप
अ – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ.