Gold Price : वर्षातील मोठा सण म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. दसऱ्याच्या मुहूर्तावर लोक सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करतात. त्यातच उद्या असणाऱ्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
देशात असणाऱ्या ज्वेलरी मार्केटमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅमच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव (Gold Price) 100 ते 350 रुपयांनी स्वस्त झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा भाव 61,400 रुपयांच्या वर आहे.
22 कॅरेट सोन्याचा भाव 56,300 रुपयांच्या वर आहे. नवरात्रीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, नवमीच्या दिवशी भाव कमी झाल्यामुळे सोने खरेदीदारांना (Gold Price) थोडा दिलासा मिळणार आहे. चांदीचा भाव 75,100 रुपये आहे. त्यातही 200 रुपयांची घसरण झाली आहे.
महत्वाच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव
* हैदराबाद – 61,600 रुपये
* कोलकत्ता – 61,450 रुपये
* गुरुग्राम – 61,600 रुपये
* मुंबई – 61,450 रुपये
* पुणे – 61,450 रुपये
* पटना – 61,500 रुपये