मुंबई – बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या अभिनयामुळे आणि स्टाइलमुळे अधिक चर्चेत असतो. लाखो तरुणी तिच्यावर फिदा आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही आतुर असतात. अनेकदा कार्तिकचे विविध अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. क्रिती सेनॉननंतर त्याचे नाव सारा अली खानसोबत जोडले गेले होते. त्यानंतर सारासोबत ब्रेकअप झाल्याकच्याही बातम्या समोर आल्या. यातच आता साराचे आणखी एका अभिनेत्रीसोबत नाव जोडले गेले आहे.
कार्तिक आर्यन तारा सुतारिया (Tara Sutaria) हिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. शनिवारी रात्री मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर हे दोघे कॅमेऱ्यात कैद झाले. यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारली. पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये हे कपल कैद झाले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
View this post on Instagram
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेस्टॉरंटबाहेर येताच कार्तिक आर्यन आणि तारा सुतारिया यांना पापाराझींनी घेरलं. कॅमेऱ्यांना पाहून ताराने पळ काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या कारमध्ये बसण्यापूर्वी ताराने कार्तिकला मिठी मारली. त्यानंतर कार्तिकने ताराला तिच्या कारमध्ये बसवले आणि तो तिथून निघून गेला. यावेळी कार्तिक आर्यनने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली होती. तर ताराने काळ्या रंगाचा टॉप आणि लेपर्ड प्रिंट स्कर्ट घातला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कार्तिक आणि ताराची जोडी ‘आशिकी 3’ मध्ये दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. यातच या दोघांचा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.