रामचंद्र सोनवणे
पांगरी ता खेड येथे जिल्हा परिषद शाळेत महिला पालकांनी महाभोंडला कार्यक्रम विद्यार्थ्यांसोबत घेऊन पारंपरिक सणाचे महत्व पटवले
राजगुरूनगर – पारंपरिक सणाची माहिती आणि त्यातील आनंद याची माहिती या पिढीतील विद्यार्थ्यांना व्हावी याहेतूने पांगरी ता खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्याना या पारंपरिक सणाची आणि त्यामध्ये असलेल्या विविध पारंपरिक कलागुनांची माहिती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन पालकांच्या संकल्पनेतून शाळेचे शिक्षक संदीप जाधव यांनी नुकतेच केले होते. ग्रामस्थांपुढे शाळेत महिला पालक व विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभागातून भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .या उपक्रमात सहभागी महिलांनी विद्यार्थ्यांपुढे “ओळखा पाहू”, “मी कोण”? यासारखे विविध खेळ सादर केले.त्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठीसुनंदा घोलप उपसरपंच, कविता घोलप, नम्रता खांडगे , सुवर्णा घोलप, मंदा घोलप, प्रियंका घोलप, मीरा घोलप, सारीका खांडगे, मंगल घोलप ,सोनाली काळे, छाया भालशिंगे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. पारंपारिक सणांची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टीने हा कार्यक्रम दरवर्षी शाळेमध्ये आयोजित करण्यात येतो. शाळेतील उपक्रम शील शिक्षक संदीप जाधव यांनी उपस्थित सर्व माता पालकांचे आभार व्यक्त केले.