मराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा

मुंबई – उद्या दिवाळीच्या मुहूर्तावर २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ तर २५ ऑक्टोबरला ‘ट्रिपल सीट’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. दरम्यान, याच आठवड्यात ‘हाऊसफुल 4’ , ‘सांड की आँख’ आणि ‘मेड इन चाइना’ हे तीन मोठे हिंदी चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटांचा चांगला आशय असूनही स्क्रीन्स मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने खळखट्याकचा इशारा दिला आहे.

दरम्यान, आज पुण्यातील प्रभात टॉकीज (किबे. लक्ष्मी) परिसरात ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता रमेश परदेशीसुद्धा या आंदोलनात सहभागी झाला. ‘मराठी चित्रपटांना शो मिळण्यास अडचणी येऊ नयेत. कारण त्यांना हे नुकसान परवडण्यासारखे नाही चित्रपटांना योग्य वेळेचे शो मिळावेत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. ही मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करावं लागेल आणि त्याची जबाबदारी थिएटर चालकांची असेल, अशा इशारासुद्धा मनसेनं यावेळी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.