राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज

पुणे : सध्या राज्यात परतीच्या पावसाने राज्यातजोरदार हजेरी लावली असून, पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान राज्यात २७ ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच मुंबई वेधशाळेने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असेल. त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.