अनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: केंद्र सरकारने दिवाळीच्या आधी दिल्लीवासियांना मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीच्या अनियमित वसाहती नियमित करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खासगी पेट्रोल पंपाबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार पेट्रोल पंप सुरू करण्याच्या नियमात शिथिल करू शकते. या निर्णयानंतर पेट्रोल आणि डिझेल मोठ्या शॉपिंग मॉल्स किंवा मोठ्या किरकोळ दुकानांतही उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

2000 कोटींची गुंतवणूक करण्याऐवजी 250 कोटी रुपयांची संपत्ती असलेली कंपनी पेट्रोल पंपदेखील उघडू शकते. जर एखादी कंपनी पेट्रोलियम क्षेत्रात व्यवसाय करत नसेल तर त्याला इंधन किरकोळ परवाना मिळू शकेल. ऑक्टोबर 2018 मध्ये पेट्रोलियम मंत्रालयाने इंधन किरकोळ संबंधित नियमांमध्ये बदल करण्यासाठी तज्ञांची समिती गठीत केली. तज्ञ समितीने अनेक शिफारसी केल्या. या निर्णयामुळे किरकोळ इंधन बाजारात स्पर्धा वाढेल.

दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देण्याची तयारी करत आहे. मोदी सरकार रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करू शकते. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक असून त्यामध्ये रब्बी पिकांची पेरणी होण्यापूर्वी प्रमुख रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ जाहीर केली जाऊ शकते. कृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) रब्बी पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याची शिफारस केली होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.