नागपूर – बेरोजगारांना प्रति महिना पाच हजार रुपये भत्ता द्या या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांना विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. राज्यात 50 लाख बेरोजगार आहेत त्यांच्यासाठीच हा भत्ता सुरू केल्यास त्यांना दिलासा मिळू शकेल, असे आमदार लंके यांनी म्हटले आहे.
राज्यातील मराठी बेरोजगार युवक-युवतींना न्याय द्यायचा असेल तर आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदे करा, अशी मागणी करत विधान भवनाच्या पायरीवर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केले. त्यासाठी न्याय द्या, न्याय द्या, बेरोजगारांना न्याय द्या..! अशा घोषणा देऊन सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
आंदोलन करणाऱ्यांमध्ये आमदार निलेश लंके, सुनील टिंगरे, हिरामण खोसकर, नितीन पवार उपस्थित होते. याप्रसंगी स्थानिक भूमिपुत्रांना/ बेरोजगारांना 80 टक्के नोकऱ्या दिल्याच पाहिजे, आंध्रप्रदेशप्रमाणे राज्यातही महाराष्ट्र स्थानिक उमेदवार रोजगार उद्योग/ कारखाने कायदा 2023 करावा. राज्यातील बेरोजगारांना प्रतिमाह 5 हजार रुपये भत्ता देण्यासाठी बेरोजगार भत्ता कायदा 2023 मंजुर करण्यात यावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
दरम्यान, विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता विधानसभेचे आणि विधान परिषदेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी संजय राऊत यांना चीनचे एजंट म्हंटल होत. यावरूनच आता @rautsanjay61 यांनी निशाणा साधलाय…#sanjay_raut #maharashtra_karnatak #Shivsena pic.twitter.com/mkcbyGl8zA
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) December 23, 2022