IPL 2023 Auction – आयपीएल 2023 लिलावात अष्टपैलू खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. या अष्टपैलू खेळाडूंमध्ये इंग्लंडचा सॅम करन आणि बेन स्टोक्स तर ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन यांच्या नावांची तुफान चर्चा झाली. पंजाब किंग्सने सॅम करनला 18.50 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. आयपीएलच्या इतिहासात आत्तापर्यंत कोणत्याही खेळाडूवर एवढी मोठी बोली लागलेली नाही. सॅम करनच्या अगोदर आयपीएल इतिहासात साऊथ आफ्रिकेचा क्रिस मॉरिस 16.25 कोटी रुपयांसह सर्वात महागडा खेळाडू राहिला होता.
सॅम करननंतर ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आलाय. ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपये खर्च करत त्याला आपल्या संघात घेतले आहे. यानंतर, इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार आणि टी-20 क्रिकेटमधील धडाकेबाज खेळाडू बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने 16.25 कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले. दरम्यान, सॅम करनला मिळालेल्या पैशांवरून आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात मिम्स शेअर केले आहेत. त्याचबरोबर सॅम करनला मिळालेल्या किमतीवरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Sam Curran becomes the most expensive player in IPL history at £1.95million 🤯
Merry Christmas 🎄 pic.twitter.com/3AebhK0br3
— England’s Barmy Army (@TheBarmyArmy) December 23, 2022
Sam Curran and Cameron Green right now. #IPLAuction #IPL2023Auction pic.twitter.com/0H9aSUG94Y
— Rajabets India🇮🇳👑 (@smileandraja) December 23, 2022
Sam Curran sold at Rs. 18.50 cr
Pakistani players watching: pic.twitter.com/7D09OIjKcY
— Sagar (@sagarcasm) December 23, 2022
My god!! Sam Curran becomes the most expensive player in the history of IPL Auctions. Sold to PBKS for a mind-blowing 18.5C! 🔥🔥 #IPLAuction pic.twitter.com/X9pWhEIwlR
— Srini Mama (Parody) (@SriniMaama16) December 23, 2022
PSL owners after seeing Sam Curran being sold for 18.50 Crore in #IPLAuctions pic.twitter.com/WN6SLK4DJy
— Surbhi 🇮🇳🚩 (@Vegetarianmee) December 23, 2022