पॅरिस – गाझामध्ये युद्धविरामाच्या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चेला प्रारंभ झाला आहे. या चर्चेमध्ये कतार, अमेरिका, इजिप्त, इस्रायल आणि हमासचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
मोसादचे प्रमुख डेविड बार्निया यांच्या नेतृत्वखाली इस्रायली प्रतिनिधी मंडळ युद्धविरामाच्या चर्चेसाठी शुक्रवारी पॅरिसमध्ये होते. इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात हमासने ओलीस ठेवलेल्यांच्या सुटकेच्या मुद्द्यावरही शिष्टमंडळाने चर्चा केली.
यापैकी तीस ओलिसांचाही मृत्यू झाल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. नोव्हेंबरमध्ये आठवडाभर चाललेल्या युद्धविरामात शंभरहून अधिक ओलीस आणि दोनशे चाळीस पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात आली.
कतार, इजिप्त आणि अमेरिका आता नवीन करार करण्याच्या प्रयत्नात आहेत. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अलिकडच्या आठवड्यात युद्धबंदीबाबत आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे. पॅलेस्टिनी भूभागावर इस्रायलच्या लष्करी हल्ल्यातील मृतांची संख्या जवळपास तीस हजारांवर पोहोचली आहे.