उत्तरकाशी – हिवाळ्यामुळे गंगोत्री मंदिर आजपासून बंद करण्यात आले. आज रविवारी अन्नकुट गोवर्धन पुजा झाल्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.
मंदिरातील गंगा मातेची मुर्ती प्रथेप्रमाणे त्यानंतर तेथून मुखबा गावात नेण्यात आली. हिवाळ्यात या मुर्तीची तेथे पुजा केली जाते. हिवाळा संपल्यानंतर मंदिर जेव्हा उघडले जाते त्यावेळी देवीची ही मुर्ती पुन्हा तिथे नेऊन ठेवली जाते.
मंदिर बंद करण्याचीही विशिष्ट पद्धत आणि विधी असतो. तो आज पुर्ण झाला. यंदा कोविडमुळेही हे मंदिर काही दिवस बंद होते. जुलै महिन्यात हे मंदिर पुन्हा उघडण्यात आले पण तेथील दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले होते. तथापि तरीही यंदा तेथे एकूण 23 हजार 500 भाविकांनी दर्शन घेतले.