उत्तराखंड : बद्रीनाथ धाम मंदिराचे कवाडं बंद

उत्तराखंड : चारधाम यात्रेपैकी एक आणि महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या बद्रीनाथ धाम मंदिराचे कवाडं (दरवाजे) हिमवृष्टीमुळे बंद करण्यात आली आहेत. केदारनाथ मंदिर आणि गंगोत्री मंदिराची कवाडं देखील याआधीच बंद केली गेली आहेत.

यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ अशा अनुक्रमे चार ठिकाणांचा चारधाम यात समावेश होतो. हिवाळ्यात अतिशय मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हिमवृष्टीमुळे चारधाम यात्रेत येणाऱ्या या मुख्य मंदिरांची कवाडं बंद केली जातात. जी, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुली होतात. 

दरम्यान, 15 मे 2020 रोजी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी बद्रीनाथ धाम मंदिराचे दरवाजे पारंपरिक रितीरिवाजानुसार खुले करण्यात आले होते. वास्तविक पाहता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर चारधाम मंदिरे भाविकांसाठी खुले करण्यात येतात. यंदा मात्र करोना संसर्ग टाळण्यासाठी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिर मे महिन्यात खुले करण्याचे निश्चित करण्यात आले होते. यंदा करोनाचे संकट असल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.