नवी दिल्ली : अनेकांचे श्रद्धास्थान असणारे केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यानंतर आज खुले करण्यात आले आहेत. पहाटे 6 वाजून 25 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चारात मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते.
मंदिर उघडण्याच्या वेळी 10 हजार भाविकही उपस्थित होते. सहा महिन्यनंतर उघडलेल्या केदारनाथ मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली. यासाठी सुमारे 10 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला होता. आज मंदिर उघडण्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथमध्ये गुरुवारपासूनच भाविकांची रीघ पाहायला मिळत आहे. केदारनाथचे मंदिर हे उत्तर आणि दक्षिण भारतातील धार्मिक संस्कृतीचा संगम मानला जातो.
गुरुवारी सकाळी गौरीकुंड येथून हजारो भाविक केदारनाथ धामकडे रवाना झाले. भाविकांनी येथून सुमारे 21 किमी अंतर पायी, घोडा किंवा पिठूने कापले. गुरुवारी सकाळी 6 वाजता सुरू झालेला प्रवास केदारनाथ धाम येथे सायंकाळी 4 वाजता संपला. क्षमतेपेक्षा जास्त भाविक आल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. शुक्रवारी सकाळी सर्वांना केदारनाथला जाण्याची परवानगी देण्यात आली.
#WATCH | The doors of Kedarnath Dham opened for devotees. Kedarnath’s Rawal Bhimashankar Linga opened the doors of Baba Kedar. On the occasion of the opening of the doors thousands of devotees were present in the Dham. pic.twitter.com/NWS4jtGstb
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 6, 2022
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चार धाम यात्रेला सुरूवात झाली आहे. चार धाम यात्रेमध्ये केदारनाथ धामचे स्थान तिसरे आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उघडण्यात आले. केदारनाथ मंदिर आज खुले करण्यात आले आहे. बद्रीनाथ मंदिर 8 मे रोजी खुले करण्यात येणार आहे.