राजगुरुनगर – खेड तालुक्यातील प्राश्चिम भागातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार गावातील ६ युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खेड पोलिसांनी तीन जणांना अटक केली आणखी तीन जण फरार झाले आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या घुमटकर, आकाश सुनिल शिंदे, परेश माणिक ढमाले, अवधुत संतोष कनसे, साईनाथ मुळुक, सुरज सुनिल रोडे (सर्व रा. चास, ता. खेड ) यांनी पिडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्यासोबत लैंगिक कृत्य केले. यातील संशयित आरोपी सोन्या घुमटकर याने धमकी देवुन जबरदस्तीने पिडित मुलीबरोबर मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. इतर पाच जनांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पिडित मुलीला धमकावुन जबरदस्तीने शाररिक संबंध करून लैगिक अत्याचार केला.
पिडित मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने फिर्याद दिली होती.पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून सोन्या घुमटकर (वय २९ ), आकाश शिंदे (वय२१), सुरज रोडे (वय२४) यांना अटक केली आहे.
परेश ढमाले, अवधुत कणसे, साईनाथ मुळूक हे फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पुण्यातील बलात्काराची घटना ताजी असताना पुणे शहरालगत असलेल्या खेड तालुक्यात अशी घटना घडल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालले आहेत. कायदा आणि सुव्यस्थेवर या घटनांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पुढील तपास महिला पोलिस उपनिरिक्षक वर्षाराणी घाटे करित आहे.