प्रशांत नाना सातव मित्रमंडळाचा उपक्रम : बारामती-मोरगाव- जेजुरी-देहू-आळंदीचरणी झाल्या नतमस्तक
बारामती – येथील प्रशांत (नाना) सातव मित्रमंडळाच्या वतीने एक हजार महिलांना मोफत देवदर्शन यात्रेचे नुकतेच आयोजन केले होते. बारामती-मोरगाव- जेजुरी- पुणे मार्गे देहू येथे 20 बसेस व 15 चार चाकी गाड्यातून या महिलांना हे देवदर्शन घडविले गेले. या उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्षे आहे.
प्रशांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली अजित साळुंके, ऍड. रमेश जाधव, नितीन चांदगुडे पाटील, दादा काटे यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू आहे. देहु येथे संत तुकाराम महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर भजन व कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी देहू आळंदी देवस्थान संस्थानचे अध्यक्ष उमेश मोरे महाराज, विश्वस्त माणिक मोरे महाराज, राज्य करआयुक्त सुनील काशिद पाटील हे उपस्थित होते.
विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केलेल्या महिलांचे या वेळी सत्कार केले गेले. मोरगावच्या दर्शनानंतर बारामतीत सर्व महिला आल्या. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शहरातील भाविक महिलांना देव दर्शन घडवले जाते गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे सुरुवातीला मोरगाव तसेच प्रति बालाजी नारायणपूर येथून सुरुवात झाली त्यानंतर कोल्हापूर, तुळजापूर ,पंढरपूर आणि यंदा देहू येथे देव दर्शन घडविले. प्रत्येक वर्षी 1000 महिलांना देवदर्शनाचा लाभ दिला जातो, अशी माहिती भाजपचे बारामतीचे नेते प्रशांत सातव यांनी दिली.