स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 73 लाखांचा मुद्देमाल जप्त
नगर – निबंळक बायपास येथे ट्रक चालक नवनाथ गोरख वलवे यांची हत्या करून ट्रक व त्यामधील दूध पावडर नेणारी दरोडेखोरांची टोळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणीहून स्थानिक गुन्हे शाखेने 73 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमालसह ताब्यात घेतले आहे.
दिलीप अशोक मुंढे (रा.सोनहिवरा, ता.परळी, जि.बीड ह.रा.इंद्रायणीनगर, सेक्टर नं.3, बिल्डिंग नं.53, भोसरी, ता.हवेली, जि.पुणे), रोहित उर्फ दाद्या शहाजी बनसोडे ( रा.शिरसागरनगर, ढवळस, ता.माढा, जि.सोलापूर,), महेश मोहन शिंदे (रा.जगदाळे नगर, कुर्डुवाडी, ता.माढा, जि.सोलापूर), ज्ञानेश्वर उर्फ सोनू विष्णू राऊत (सूतार आळी, ढवळस, ता.माढा, जि.सोलापूर), शिवाजी धनाजी पाटील (रा.पाटील वस्ती, उजनी, सोलापूर), रवीराज ज्ञानदेव बनसोडे (जि.सोलापूर), शाहीद इस्माईल शेख अशी पकडण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. या आरोपींना दि.18 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा मुंढे व त्याच्या साथीदाराने केला असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार मनोहर गोसावी, दत्ता गव्हाणे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, सोन्याबापू नानेकर, रवींद्र कर्डीले, आण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, रवि सोनटक्के, संतोष लोढे, सचिन आडबल, योगेश सातपुते, रणजित जाधव, विजय ठोंबरे, सचिन कोळेकर, भरत बुधवंत आदिंच्या पथकाने सापळा रचून आरोपी ताब्यात घेतले.