राशीनच्या किराणा दुकानातून चार गोण्या गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हा दाखल होणार

कर्जत – तालुक्‍यातील राशीन येथील कुरेशी गल्लीतील वसीम सलीम बेग यांच्या किराणा दुकानातून चार गोण्या गुटखा पकडला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून राशीन येथील किराणा दुकानात छापा टाकण्यात आला. पोलिसांनी दुकानाची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी दुकानातून चार गोण्या गुटखा हस्तगत केला. पोलिसांनी गुटखा जप्त केला असून मालक वसीम बेग यास ताब्यात घेतले आहे. अन्न व भेसळ अधिकारी यांच्याकडून गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या छाप्यात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्यासह जगदाळे, शेख, महिला पोलिस पवार सहभागी झाले होते. या कारवाईमुळे तालुक्‍यात चोरीच्या मार्गाने गुटखा खरेदी करुन त्याची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत अंदाजे लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.