पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवर आज ब्लॉक

दोन्ही बाजूंची वाहतूक जुन्या मार्गाने वळविणार

पुणे – पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवरील तुटलेली ओव्हरहेड वीजवाहिनी महापारेषणच्या वतीने बदलण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी दि.25 जून रोजी परंदवाडी या गावाच्या हद्दीत दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात येणार आहे, यावेळी दोन्ही बाजूंची वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने वळविण्यात येणार आहे.

महापारेषणच्या वतीने यापूर्वी टाकण्यात आलेली ओव्हरहेड वीजवाहिनी तुटली आहे. त्यामुळे ती नव्याने टाकण्यात येणार आहे. यादरम्यान सर्व प्रकारची हलकी आणि अवजड वाहने या कामाच्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर आधी थांबविण्यात येणार आहे. मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी चारचाकी वाहने आणि प्रवासी वाहने ही या महामार्गावरील किवळे पूलापासून जुन्या पुणे- मुंबई महामार्गाने वळविण्यात येणार आहे. तर पुण्याहून येणारी हलकी चारचाकी आणि अन्य प्रवासी वाहने उर्से टोलनाका (तळेगांव) येथून जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वळविण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.