अकोला – भारतीय जनता पक्षाचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अचानक त्यांना त्रास होऊ लागल्याने खासदार धोत्रे यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी धोत्रे यांच्यावर उपचार सुरु केले असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.
खासदार संजय धोत्रे हे मागील काही दिवसांपासून अकोल्यातील आपल्या निवासस्थानी आराम करत होते. यादरम्यान दोन दिवसाअगोदर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. धोत्रे यांच्यावर उपचार चालू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे भाजपच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.